Murder of a nine-month-old girl by drowning
Murder of a nine-month-old girl by drowning  
नागपूर

मोठी बातमी : पत्नीसोबतच्या वादातून नऊ महिन्यांच्या मुलीचा पाण्यात बुडवून खून 

अनिल कांबळे

नागपूर : पत्नीसोबत क्षुल्लक वाद झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून खून केला. त्यानंतर बियरच्या बॉटलने स्वतःच्या गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी पित्यावर मेडिकल रूग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

ही थरारक घटना भांडे प्लॉटमध्ये आज दुपारी उघडकीस आली. या घटनेने रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अलविना सोनू शेख, असे खून करण्यात आलेल्या चिमुकलीचे नाव आहे तर सोनू शेख (वय 30) असे आरोपी पित्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शेख हा खासगी वाहनावर चालक आहे. गुरुवारी दुपारी त्याचा पत्नीसोबत वाद झाला. त्यामुळे सोनू संतापला. तो नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन शंकर साई मठ येथे आला. येथील ड्रममधील पाण्यात अलविनाला बुडवून ठार मारले. त्यानंतर सोनू याने बिअरची बाटली फोडली. फुटलेल्या बाटलीने गळ्यावर सपासप वार केले. 

रक्ताच्या थारोळ्यात तो खाली पडला. काही नागरिकांच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी घटनेची माहिती सक्करदरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी सोनू याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ड्रममधून अलविनाचा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी खुनाचा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT